नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: अंकगणित सराव (20 MCQs)
महत्त्वाचे प्रश्न आणि स्पष्टीकरण. अचूक पर्याय निवडा.
1. सात अंकी लहानात लहान संख्या आणि सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती?
2. 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांपासून बनलेली पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? (अंक पुन्हा न वापरता)
3. पहिल्या दहा सम संख्यांची बेरीज किती?
4. 75,392 या संख्येतील '5' ची स्थानिक किंमत किती?
5. 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत?
6. 12 आणि 15 यांचा लसावि (LCM) किती?
7. 1/4 या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा.
8. एका वस्तूची खरेदी किंमत 400 रुपये आणि विक्री किंमत 480 रुपये असल्यास नफा किती टक्के झाला?
9. दरसाल दरशेकडा 5 टक्के दराने 2000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळव्याज किती?
10. 2.5 + 0.25 + 0.025 = किती?
11. चौरसाची बाजू 8 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
12. 60 चे सर्व विभाजक किती आहेत?
13. ताशी 60 किमी वेगाने जाणारी गाडी 3 तासात किती अंतर कापेल?
14. एका आयताची लांबी 10 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास त्याची परिमिती किती?
15. 48 ÷ (12 - 4) + 2 = ?
16. लहानात लहान विषम मूळ संख्या कोणती?
17. 15 चे पहिले पाच पट (Multiples) यांची बेरीज किती?
18. एका रांगेत एकूण 25 मुले आहेत. रामचा क्रमांक दोन्ही बाजूकडून सारखाच असल्यास त्याचा क्रमांक कितवा?
19. 500 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम?
20. एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 येतो आणि बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा