एका शब्दाचे अनेक अर्थ

                  

शब्दअनेक अर्थ
अभंगन भंगलेला, का व्यरचनेचा  एक  प्रकार
अनंतपरमेश्वर, अमर्याद
अंगशरीर, बाजू, भाग
अंकसंख्या, मांडी
अंबरआकाश, वस्त्र
अंतरमन, लांबी, भेद, फरक
आसइच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा
आनंदसुखाची कल्पना, मुलाचे नाव
ओढाआकर्षण, मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ
उत्तरप्रश्नाचे उत्तर (खुलासा), एका दिशेचे नाव
ऋणवजाबाकीचे चिन्ह, कर्ज, उपकार
करहात, सरकारी सारा,किरण
कलमरोपांचे कलम, लेखणी
कळवेदना, भांडणाचे कारण, गुप्त किल्ली, बटन
कर्णमहाभारतातील योद्धा, कान, त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू
काळवेळ, मृत्यू, यम
कांबळेघोंगडी, एक आडनाव
किरणउन्हाची तिरीप, व्यक्तीचे नाव
कीर्तीप्रसिद्धी, मुलीचे नाव
कुबेरइंद्रदेवाचा खजाना, खूप श्रीमंत व्यक्ती
गार थंड,बर्फाची गोटी
घटझीज, मडके
घाटडोंगरातला रस्ता, नदीच्या पायऱ्या
चक्र चाक,एक शस्त्र
चरणपाय, ओळ
चूक दोष,लहान खिळा
चिमणी एक पक्षी,गिरणीचे धुराडे
चिरंजीवमुलगा, दीर्घायुषी
चीज सार्थक, दुधापासून बनवलेला पदार्थ 
छंदनाद, काव्यरचनेचा एक प्रकार
जलदलवकर, ढग 
जनालोकांना, स्त्रीचे नाव
जातसमाज, प्रकार 
जोडाबूट, जोडपे
जीवनआयुष्य, पाणी
डावकपट, कारस्थान, खेळी
तट कडा,किनारा,किल्ल्याची भिंत 
तळीतळाला, ताम्हन, तलाव
ताव तापविणे,कागद
तीर काठ,बाण,बांध
दंड काठी,शिक्षा,बाहू
द्वीजपक्षी, दात, ब्राह्मण
धनी  श्रीमंत मनुष्य,मालक
धडअखंड, स्पष्टपणे, मानेखालचा शरीराचा भाग
धडापाठ,रिवाज
ध्यानसमाधी, चिंतन, भोळसर व्यक्ती
नग पर्वत,वस्तू
नाव नाव,होडी
नाद छंद,आवाज,आवड
पय पाणी,दूध 
पत्र पान,चिठ्ठी
पक्ष पंख,वादातील बाजू,पंधरवडा,राजकीय संघटना
परीपंख असलेली काल्पनिक देवता 
पारझाडाभोवतालचा ओटा, पलीकडे
पानजेवणाचे ताट, वहीचे पान, झाडाचे पान 
पालसरपटणारा प्राणी, राहुटी 
पालकआईवडील, पालनपोषण करणारे, एक पालेभाजी
पास परवाना,उत्तीर्ण 
पूर पाण्याचा लोंढा,नगर
प्रतापपराक्रम, मुलाचे नाव 
प्रवीणकुशल, मुलाचे नाव
भाव भक्ती,किंमत,भावना,दर
मान शरीराचा एक अवयव,प्रतिष्ठा
माया धन,ममता
माळ फुलांचा सर,ओसाड जागा
रस द्रवपदार्थ,गोडी
रक्षारक्षण,राख
वर आशीर्वाद,नवरा,वरची दिशा
वळण प्रवृत्ती,वाकडा रस्ता
वजन मान,भार
वचन भाषण,प्रतिज्ञा
वात ज्योत,वारा,विकार
वार दिवस,घाव
वाणी व्यापारी,उद्गार,बोलणे
सुमन फूल,पवित्र मन
हार पराभव,फुलांची माळ

             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...