विरुद्धार्थी शब्द

                                      विरुद्धार्थी शब्द


एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय.

विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x )  चिन्ह देतात.


पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.


१) ताईचे दप्तर जुने झाले होते, म्हणून आईने तिला वाढदिवसाला नवे दप्तर भेट दिले.

२) आत्ताच ऊन होते आणि लगेच सावली झाली.


१) ' जुने ' या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' नवे ' हा आहे.

२) ' ऊन ' या  शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' सावली ' हा आहे.


विरुद्ध याचा अर्थ नेमका उलट अर्थ होय.


१) जुने x नवे 

२) ऊन x  सावली 


पुढे पाहूया विरुद्धार्थी शब्द.


"अ"

शब्द

विरुद्धार्ती  शब्द

अर्थ

अनर्थ

अनाथ

सनाथ, पोरका

अमर

मर्त्य

अटक

सुटका

अनुकूल

प्रतिकूल

अबोल

बोलका

अलीकडे

पलीकडे

अळणी

खारट

अजरामर

नाशिवंत, नश्वर

अध्ययन

अध्यापन

अपमान

सन्मान

अंधार, काळोख

प्रकाश, उजेड

अंथरूण

पांघरूण

आधी

नंतर

आदर

अनादर

आवड

नावड

आज

उद्या, काल

आत

बाहेर

आस्तिक

नास्तिक

आवडते, लाडके

नावडते

आशा

निराशा

आधार

निराधार

आरंभ, सुरुवात

शेवट

आठवणे

विसरणे

आग्रह

अनाग्रह, दुराग्रह

आनंद

दुःख

आशीर्वाद

शाप

आवश्यक

अनावश्यक

आदिम

अंतिम

आकलनीय

अनाकलनीय

ओळखीचे

अनोळखी

ओले

सुके, कोरडे

   

"इ"

इवले

प्रचंड

इकडे

तिकडे

इथली

तिथली

इमानी

बेइमान

इलाज

नाईलाज

इहलोक

परलोक


"उ"

उपकार

अपकार

उगवणे

मावळणे

उदय

ह्रास

उतरण

चढण

उपाय

निरुपाय

उदार

कंजूष

उजवा

डावा

उग्र

सौम्य

उष्ण

थंड, शीतल

उच्च

नीच

उचित

अनुचित

उपकार

अपकार

उन्नती

अवनती

उत्कर्ष

अपकर्ष

उघड

गुप्त

उदय

अस्त

उलट

सुलट

उत्साह

निरुत्साह,  मरगळ

उगवती

मावळती

उजेड

काळोख

उभे

आडवे

उत्तीर्ण

अनुत्तीर्ण

उंच

सखोल, बुटका, ठेंगू, सखल

ऊन

सावली


"क"

कडक

नरम

कबूल

नाकबूल

कमी

जास्त, पुष्कळ

कळत

नकळत

कठीण

मृदू

कच्चे

पक्के

कडू

गोड

कबूल

नाकबूल

कडक

नरम

कच्चा

पक्का

कळस

पाया

कर्कश

मधुर, संजुल

कमकुवत

भक्कम

कल्याण

अकल्याण

कष्टाळू

कामचोर

कायदेशीर

बेकायदेशीर

काळोख

प्रकाश, उजेड

काळे

पांढरे, सफेद

कोरडे

ओले

कोवळे

राठ, निबर, जून

किमाल

कमाल

कीव

राग 

कीर्ती

अपकीर्ती

कौतुक

निंदा

क्रूर

प्रेमळ, मायाळू, दयाळू

कृतज्ञता

कृतघ्नता

कृतज्ञ

कृतघ्न

कृपा

अवकृपा 

कृत्रिम

नैसर्गिक, स्वाभाविक

कृश

स्थूल


“ख”

खरेदी

विक्री

खरे

खोटे

खाली

वर

खोली

उंची

खोल

उथळ

खोटेपणा

खरेपणा

खुश

नाखूष

खूप

कमी

खिन्न

प्रसन्न्न


“ग”

गच्च, गर्द, दाट

विरळ

गरम, उष्ण

थंड, गार

गरीब

श्रीमंत

गरिबी

श्रीमंती

गर्व

विनय

गुलामी

स्वातंत्र्य

गुरु

शिष्य

गुण

दोष

गोड

कडू

गोरा 

काळा

ग्राहक

विक्रेता

ग्राह्य

त्याज्य 


"घ"

घन

द्रव

घट्ट

सैल, पातळ

घाऊक

किरकोळ

घाणेरडा

स्वच्छ


"च"

चढणे

उतरणे

चढून

उतरून

चढ

उतार

चढाई

माघार

चपळ

मंद

चविष्ट

बेचव

चल

अचल

चारित्र्यवान

चारित्र्यहीन

चिमुकले

अवाढव्य, प्रचंड

चूक

बरोबर

चिंताग्रस्त

चिंतामुक्त

चांगला

वाईट

चोर

साव


" छ "

छोटी

मोठी

छोटेसे

मोठेसे


" ज "

जर

तर

जहाल

मवाळ

जमा

खर्च

जड

हलके

जय

पराजय

जमा

खर्च

जन्म

मृत्यू

जलद

हळू

जगणे

मरणे

जवळची

लांबची

जबाबदार

बेजबाबदार

जास्त 

कमी

जाणे

येणे

जागृत

निद्रिस्त

जागरूक

निष्काळजी

जिवंत

मृत

जिंकणे

हरणे

जीत

हार

जुने

नवे

जेवढा

तेवढा

जोश

कंटाळा


" त "

तहान

भूक

तरुण

म्हातारा

ताजे

शिळे

ताजी

शिळी

तारक

मारक

ताल

बेताल

तारक

मारक

तीक्ष्ण

बोथट

तीव्र

सौम्य

तीक्ष्ण

बोथट

तिरपा

सरळ

तिरके

सरळ

तेजी

मंदी

तेजस्वी

निस्तेज


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...