लिंग (Gender) :-
खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पहा.
मुलगा खेळतो.
मुलगी खेळते.
वरील वाक्यांत मुलगा हे पुरुष जातीचे नाव आहे, व मुलगी हे स्त्री जातीचे नाव आहे.
माणसांमध्ये पुरुष व स्त्री असा भेद असतो.
तसेच,
घोडा खिंकाळतो.
घोडी खिकाळते.
वरील वाक्यांत घोडा हे नर जातीचे नाव आहे, व घोडी हे मादी जातीचे नाव आहे.
प्राण्यांमध्ये नर व मादी असा भेद असतो.
ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होतो , त्यास लिंग असे म्हणतात .
नामाचे दोन प्रकार आहेत :-
पुल्लिंग ( तो ) Musculine
स्त्रीलिंग ( ती ) Feminine
पुल्लिंग ( तो ) Musculine :- ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो , त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
उदाहरणार्थ : भाऊ , मामा इत्यादी
पुल्लिंगी नामे
तो - मुलगा
तो - लेखक
तो - बोका
तो - घोडा
स्त्रीलिंग ( ती ) Feminine :- ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो , त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदाहरणार्थ : बहीण , मामी इत्यादी
स्त्रीलिंगी नामे
ती - मुलगी
ती - लेखिका
ती - मांजर
ती - घोडी
लिंगबदल :-
पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रूपांतर करणे व स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर करणे , याला लिंगबदल असे म्हणतात.
(Note) लक्षात ठेवा :- वाक्यातील एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास क्रियापदाचे रूपही अनेकदा बदलते.
उदाहरणार्थ :-
मुलगा खेळतो. -->> मुलगी खेळते.
बैल गवत खातो. -->> गाय गवत खाते.
१) समान पद्धतीने होणाऱ्या काही नामाचा लिंगबदल :-
अ) ( अ, आ <--> ई )
ब) ( अ, ई <--> ईण )
क) ( अ <--> आ , इका )
२) अनियमित पद्धतीने होणारे नामाचे लिंगबदल :-
३) काही मराठीतील शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
अ) पुल्लिंगी व स्त्रीलिंग अशा दोन्ही लिंगात आढळणारे :
उदा. बाग, वेळ, वीणा, मजा, ढेकर, तंबाखू, व्याधी, संधी.
ब) पुल्लिंगी व नपुसकलिंगी शब्द :
उदा. नेत्र, हरीण.
क) पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी अशा तिन्ही लिंगात आढळणारे :
उदा. पोर, मूल.
४) परभाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात.
उदा.
५) काही शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असून ते स्त्रीलिंगी मानतात.
उदा. जळू, पिसू, मैना, सुसर, घूस, घार, ऊ इत्यादी.
६) काही शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असून ते पुल्लिंगी मानतात.
उदा. साप, सुरवंट, मासा, पोपट, तोल, गरुड इत्यादी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा