विरामचिन्हे आणि त्यांचा उपयोग
विरामचिन्हे
वाचताना वाक्ये कुठे संपते? प्रश्न कोठे आहे? उद्गार कोणता वाक्य कोठे ?किती थांबावे? हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात
विराम चिन्ह चे प्रकार
1) पूर्णविराम--------. वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी (.)असा एक टिंब देतात त्याला पूर्णविराम म्हणतात.
उदा. मुले परत निघाली. आई एकदम चकित झाली.
आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपे यांच्या शेवटी.
उदा. पु .ल . देशपांडे, बी.ए. , म.सा.वी.
2) अर्धविराम--------. दोन छोटी वाक्ये जोडताना उभया नववी अवयव यायच्या आधी (;)असे चिन्ह दिले जाते त्याला अर्धविराम म्हणतात
उदा. आग वाढत चालली होती ; पण गोदावरीबाई ना त्यांची तमा नव्हती
3) स्वल्पविराम---------. एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्य लागोपाठ आल्यास शेवटच्या शब्द खेरीज किंवा शेवटच्या वाक्य खेरीज प्रत्येका नंतर (,)असे चिन्ह दिले जाते त्याला स्वल्पविराम म्हणतात.
उदा तांदूळ, गहू ,ज्वारी ,बाजरी ही तृणधान्य आहे
4) अपूर्ण विराम-------. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास (:) हे चिन्ह वापरतात त्याला अपूर्णविराम म्हणतात
उदा. पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा : एक-दोन-तीन-चार
5) उदगार चिन्ह-------- उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी असे (!)चिन्ह दिले जाते त्याला उद्गार चिन्ह म्हणतात.
उदा. किती हो गोंधळे तुम्ही! आता काय बोलावं कपाळ!
6. एकेरी अवतरण चिन्ह-------. लेखनात एखादे सुभाषित क्लुप्ती म्हणून देताना अथवा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना अशी ('-'तिने दिले जाते त्याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात
उदा.'जय जवान जय किसान ' ही घोषणा शास्त्री यांनी दिली
7) दुहेरी अवतरण चिन्ह------ बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवितांना अशी ("--" )चिन्ह दिले जाते त्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात
उदा. साधू म्हणाले, " असा निरास होऊ नकोस."
8) प्रश्नचिन्ह--_--- प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी (?)चिन्ह दिले जाते त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात.
उदा. शाळा कधी सुरू होतील?
9) संयोग चिन्ह------+दोन शब्द जोडताना अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास असे (-) चिन्ह देतात त्याला संयोग चिन्ह म्हणतात
उदा. प्रेम -विवाह स्त्री-पुरुष
10. लोप चिन्ह---- घुटमळत गेलेले अथवा अर्धवट तोडलेले अथवा बोलता-बोलता विचार खंडित झालेले दाखवण्यासाठी (......)हे विरामचिन्ह वापरतात.
उदा मला ते पाहायचं होतं ,पण………
11. दंड------ ओवी अभंग श्लोक यासारख्या वाक्य प्रकारात व चरणाचा शेवट दाखवण्यासाठी. असे (|| )चिन्ह वापरतात.
उदा. देह देवाचे मंदिर| आत आत्मा परमेश्वर||
12. विकल्प चिन्ह------ एखाद्या शब्दासाठी आलेला पर्याय दाखवण्यासाठी मध्ये असे (/) चिन्ह वापरले जाते त्याला विकल्प चिन्ह म्हणतात.
--------------------------- संकलन -------------------
भाऊसाहेब सूर्यवंशी सर केद्रीय प्राथमिक शाळा सालेगाव ता.कळमनुरी जि हिंगोली
मो.न. 9623807850
जी.प. प्रा. शा. सालेगाव आपले हार्दिक स्वाग
Pages
- गोपनीय अहवाल
- दैनिक परिपाठ
- pan आणी adhar लिंक करणे
- आयकर विभाग
- 10 वी व 12 वी
- माहितीचा अधिकार
- नागरिक सेवा
- मराठी बोधकथा
- विद्या प्राधिकरण
- महाराष्ट शासन जि.आर.
- शाळा शिधी
- शालार्थ
- मतदार यादीत आपले नाव शोधा
- निकाल पत्रक सॉफ्टवेअर
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- तयारी स्पर्धा परीक्षेची
- तयारी स्पर्धा परीक्षेची ---- मराठी
- तयारी स्पर्धा परीक्षेची ------ गणित
- तयारी स्पर्धा परीक्षेची ---- बुद्धिमत्ता
- तयारी नवोदयची 2026
विरामचिन्हे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
वर्णनात्मक नोंदी
अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...
-
तयारी नवोदयची २०२६ तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन सराव चाचणी जमालिखित या ठिकाणी दर...
-
नफा-तोटा म्हणजे काय? नफा-तोटा हा कोणत्याही व्यवसायाचा किंवा व्यवहाराचा एक महत्त्वाचा भाग आह...
-
विद्यार्थ्यांसाठी संख्यांचे अवयव या घटकावर आधारित संख्यांचे अवयव (Factors of a Number) जेव्हा आपण एका संख्येला दुसऱ्या संख्येने भाग देतो आण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा