निकाल पत्रकाचे सॉफ्टवेअर
- नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व शिक्षक बांधवांना व भगिनींना हार्दिक शुभेच्छा आज पासून म्हणजेच दिनांक 15 जून 2021 पासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे मागील वर्षाचा निकाल करण्याचे काम काही शिक्षकाचे अजूनही बाकी आहे. त्यासाठी मी आज एक खूप मेहनत करून एक सॉफ्टवेअर बनवली आहे या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपला निकाल लवकरात लवकर तयार होईल
सॉफ्टवेअर ची वैशिष्ट्ये.
- ह्या सॉफ्टवेअर मिळतील मुख्य पानावर काही सूचना दिलेले आहेत हे सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सूचना वाचल्या नंतर मुख्य पानावर जा मुख्य पानावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव तालुका जिल्हा लिहा त्यानंतर पहिल्या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक आहे दुसऱ्या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांची नावे आहेत विद्यार्थ्यांची नावे लिहा आणि पुढील प्रत्येक विषयनिहाय गुण द्या. गुण टाकल्यानंतर आपोआप एकूण गुणांची बेरीज होईल व श्रेणी तयार होईल.
- दुसऱ्या पानावर नोंदवही आहे या नोंदवही वर फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक हा ड्रॉप डाऊन मधून उडवायचा आहे तो निवडल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे सर्व गुण नाव आपोआप तिथे तयार होईल पुढील कॉलम मध्ये नोंदी आहेत सुद्धा ड्रॉप मेनू निवडायचे आहेत.
- श्रेणी निकाल या पानावर काहीही करायचे नाही आपल्याला श्रेणी निकाल हवा असल्यास या पिकाचे प्रिंटआऊट घ्या.
- त्यापुढे सीट आहे वार्षिक निकाल पत्रक वार्षिक निकाल पत्रक मध्ये फक्त शाळेचे नाव बदला त्यामध्ये सर्व निकाल आपोआप तयार झालेला आपल्याला दिसून येईल.
- त्यानंतर पुढील पेजवर प्रगती पत्रक आहे प्रगती पत्रक यामध्ये सुद्धा तुमच्या शाळेचे नाव बदला परीक्षा क्रमांक हा ड्रॉप-डाऊन मेनू मधून निवडा तो निवडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आणि त्याचे सर्व गुण आपोआप तयार आपल्याला झालेली दिसते वर्णनात्मक नोंदी हासुद्धा ड्रॉप-डाऊन मेनू मधून निवडा हाताने द्यायचे काम नाही.
- सीट 5 आणि शीट चार वर काहीही करायचे नाही
- वरील प्रमाणे सूचनांचे पालन केल्यास आपला रिझल्ट लवकरात लवकर मध्ये अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला तयार झालेला दिसून येईल आपल्याला हव्या त्या चे प्रिंट आउट आपण घेऊ शकता .
- हे सॉफ्टवेअर फक्त पाचवीच्या वर्गासाठी आहे कारण यावर्षी निकाल हा आकारिकक गुणावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक वर्गाचे वेगवेगळे आहे त्यामुळे फक्त पाचवीला ची निकाल शीट वापरता येईल
निकाल तयार करण्यासाठी सर्वांना एकदा शुभेच्छा
निकाल सॉफ्टवेअर आवडले असल्यास मला फॉलो करा. निकाल सॉफ्टवेअर बाबत कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय लिहा
धन्यवाद
- भाऊसाहेब सूर्यवंशी
- सहशिक्षक केंद्रीय प्राथमिक शाळा सालेगाव ता
कळमनुरी जिल्हा हिंगोली
निकाल पत्रक download करण्यासाठी खाली दिलेल्या download या शब्दावर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा