गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

मूल्यमापन २०२१

                                                   मूल्यमापन नोंदवही 

नमस्कार शिक्षक मित्रांनो, एप्रिल पूर्ण महिना संपत आला तरीही मूल्यमापन ना संदर्भात स्पष्ट अशा सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाही. तरीसुद्धा आपले लेव्हलवर मूल्यमापनाच्या नोंदी आपल्याला करावे लागतील.

करोना या महामारी च्या काळात सर्वत्र बाजार पेठा दुकाने बंद आहेत. त्यामुळे आपल्याला नोंदवही मिळत नाही.तेव्हा मुलाच्या  नोंदी कशा कराव्यात व निकाल कसा तयार करावा याबाबत प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पुढील सत्र चालू झाल्यावर म्हणजेच जून महिन्यामध्ये एखादा विद्यार्थी आपल्याकडे टिसी मागण्यास आला तर त्याला टीसी बरोबर आपल्याला त्याचे गुणपत्रक सुद्धा द्यावे लागेल.त्या वेळेस आपल्या मदतीला कुणीही येणार नाही .टी. सी. साठी आलेला  विद्यार्थी किती तंग करतो हे आपल्याला सांगण्याची गरज नाही . त्यामुळे आत्ताच आपल्याला आपल्या पद्धतीने निकाल पत्रक तयार करावे लागेल. तेव्हाच त्याला आपल्याला त्याची गुणपत्रक देता येईल

निकाल कसा तयार करावा ? किती गुणाला कोणती श्रेणी द्यावी  तेही वर्ग निहाय  याबद्दल मी मागे एक पोस्ट टाकली होती ती आपण वाचली असेलच त्याचा आधार घेऊन शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची मूल्यमापन नोंदवही कशी असावी याबद्दल एक थोडक्यात एका विद्यार्थ्याची एकाच पानावर प्रथम सत्र व द्वितीय सत्र आकारिक व संकलित दोन्ही प्रकारचे मूल्यमापन एकाच पेजवर बसविली आहे. मी दिलेल्या नमुन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती तयार केली तर कमी वेळामध्ये आपले काम पूर्ण होईल. या शीट ची झेरॉक्स काढून त्यावर विद्यार्थ्याचे नाव वर्ग हाजरी क्रमांक लिहून त्याचे प्रकारचे गुण भरावे. बाजारात वही उपलब्ध नसल्यामुळे अशापेजच्या प्रिंट काढून  आपल्याला त्याचे संकलन करून नोंदवही तयार करता येईल मी तयार केलेली एका विद्यार्थ्याची मूल्यमापन नोंदवही पहा. त्यामध्ये काही सुधारणा असल्यास आवश्यक कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज लिहा

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गूगल शीट डाउनलोड करा गुगल सीट डाउनलोड करण्यासाठी

https://drive.google.com/file/d/1Akj1zeBr6u7gX0qzU0-9zFjpWPXfGDri/view?usp=sharing



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...