शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

महाराष्ट्र दिनविशेष 2021

 महाराष्ट्र दिन विशेष 

ऑनलाइन स्पर्धा परीक्षा

विशेष सूचना--- चाचणी सोडण्याची वेळ दिनांक 1 मे 2021 रोजी सकाळी ठीक नऊ वाजल्यापासून सुरू होईल

आज महाराष्ट्र दिन. आजचा दिवस हा वर्षभराच्या कालावधीत केलेल्या कामाचा म्हणजेच विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट असतो. आजच्या दिनाची  उत्सुकताही संमिश्र असते. पास होईल की नापास अनामिक भीती किंवा ओढ ही आजच्या रात्रीपासून लागलेली असते. कधी 1 मे उजाडतो. अन कधी शाळेत जाऊन माझा निकाल बघतो. असा हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो. पण आज हा 1मे कोरूना या मामाच्या सावटाखाली आला आहे. त्यामुळे निकालाची ओढ आहे ना शाळेची ओढ आहे.

या अशा भीतीच्या सावटाखाली आपल्याला घरी बसून काही करता येईल का या विचाराने प्रेरित होऊन मी आपल्यासाठी एक मे दिनविशेष म्हणून एक ऑनलाईन स्पर्धा चाचणी तयार केली आहे. या चाचणीमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल देशाचा भूगोल आणि इतर प्रकारचे अनेक प्रश्न यांचा समावेश केलेला आहे. याचाचणी मध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी कराव्या लागतील. ही चाचणी सोडवल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र ऑटोमॅटिक मिळेल त्यासाठी आपल्याला खालील गोष्टीची आवश्यकता आहे.

1. आपले ई-मेल अकाउंट असणे आवश्यक आहे. हा ई-मेल अकाउंट आपल्या मोबाइलमध्ये असतोच. तू शोधून एका कागदावर लिहून ठेवायचा आहे. कारण या ई-मेल अकाउंट वर आपले प्रमाणपत्र मिळणार आहे.

2. ही चाचणी 50 प्रश्न व 100 गुणांची आहे या चाचणीमध्ये पन्नास गुण असणे आवश्यक आहे 50 गुण असलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे ही चाचणी सोडवितांना काळजीपूर्वक सोडवा.

3. प्रत्येक म्हणजेच एका ई-मेल अकाऊंट ला ही चाचणी फक्त एकदा सोडविता येणार आहे पुन्हा प्रयत्न केल्यास   चाचणी ओपन होणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि चाचणी सोडवा.

4.चाचणी ची लिंक ही 1 मे 2021 सकाळी नऊ वाजता लिंक ओपन होईल त्यानंतर आपल्याला चाचणी सोडविण्यास सुरुवात करावी लागेल ते अगोदर आपल्याला चाचणी सोडवता येणार नाही.

5. या चाचणीची लिंग ही नऊ वाजल्यापासून दिवसभरासाठी ओपन राहील. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही चाचणी सोडू शकता.

6. सर्व चाचणी सोडवून झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर आपले सर्टिफिकेट ई-मेलवर तयार झाली असेल. त्यासाठी आपले ई-मेल ओपन करा. तिथे आपले सर्टिफिकेट डाऊनलोड करून परीक्षेचा आनंद घ्या.

या ऑनलाईन स्पर्धा चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/rrhGbtvkNErLPVGQ7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...