शै. वर्षे 2021 चा निकाल
शैक्षणिक वर्ष 2021 चा निकाल कसा तयार करावा हा हा एक मोठा प्रश्न शिक्षका पुढे उभा आहे. शासन स्तरावरून निकाल कसा तयार करावा याच्या गाईडलाईन मार्गदर्शक सूचना याचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये निकाल कसा तयार करावा याबद्दल संक्षिप्त माहिती दिली. पण निकाल प्रत्यक्षपणे कसा तयार करावा हा प्रश्न कायमच आहे. माझ्या माहितीप्रमाणे निकाल पुढील प्रमाणे तयार करावा.
निकाल तयार करताना प्रथम आपले विद्यार्थ्याचे दोन गट तयार करावे लागतील त्यापैकी पहिल्या गटात जे विद्यार्थी की आपल्या ऑफलाइन व ऑनलाइन वर्गाला नियमित उपस्थित होते. दुसरा गट हा अशा विद्यार्थ्यांचा असेल जे स्थलांतरित झाले किंवा त्यांचा शैक्षणिक वर्षांमध्येआपला कधीही संपर्क होऊ ना शकला नाही अशा विद्यार्थ्यांचा असेल
दोन्ही विद्यार्थ्यांचे गट लक्षात घेऊन निकाल पुढील प्रमाणे तयार करावा.
जे विद्यार्थी नियमितपणे आपल्या ऑफलाइन व ऑनलाइन वर्गाला उपस्थित होते त्यांचा निकाल
1 वि आकारिक नोंदी पूर्ण कराव्यात
2. विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन पूर्ण करून त्यांच्या मूल्यमापन तंत्रानुसार गुण द्यावेत व त्या गुणांचे रूपांतर शंभर मध्ये करून प्रत्येक विषयाची श्रेणी निश्चित करावी.
3. प्रथम सत्र व द्वितीय सत्र वेगवेगळा निकाल तयार करावा.
4. विद्यार्थ्यांच्या नोंदी करतेवेळेस त्यामध्ये covid-19 चा शैक्षणिक कार्यात आलेला अडथळा नमूद करा.
5. कोणत्याही परिस्थितीत सध्या संकलित मूल्यमापन ऑफलाइन किंवा ऑनलाईन घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.
गट दुसरा. ज्या विद्यार्थी तर संपर्क झालाच नाही किंवा जे स्थलांतरित आहे अशांच्या बाबतीत.
1 . या गटातील विद्यार्थी आपल्या संपर्कात या वर्षी आलेच नाही किंवा जे स्थलांतरित आहे. त्यामुळे त्यांचा आकारिक मूल्यमापन होऊ शकले नाही.
2. या गटातील विद्यार्थ्यांच्या कोणत्याही नोंदी किंवा आकारिक मूल्यमापनाची गुण देऊ नयेत.
3. या गटातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर खालील प्रमाणे शेरा लिहावा.
"आरटीई ऍक्ट 2009 कलम 16 नुसार वर्ग उन्नत करण्यात आले"
वरील पहिल्या ग गटातील विद्यार्थ्यांना "क" श्रेणी मिळाली आहे. त्यांच्यासाठी पुढील वर्षी उपचारात्मक अध्यापन विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. याबद्दल एमपीएससी कडून मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील.
वरील मार्गदर्शक सूचना शिवाय इतर कोणत्याही यंत्रणेचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन करण्याच्या प्रयत्न करू नये.
वरील प्रमाणे सर्व नोंदी पूर्ण करून प्रगती पुस्तक तसेच संच यिका चे नोंद पत्रक विहित वेळेत पूर्ण कराव्यात.
अधिक माहितीसाठी शासनाचा मूल्यमापनाच्या बाबतीत चा जीआर चा अभ्यास करावा
@@ संकलन @@
भाऊसाहेब सूर्यवंशी.
केंद्रीय प्राथमिक शाळा सालेगाव. तालुका कळमनुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा